नवी दिल्ली : गृहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. होळीच्या आधी तुम्ही स्वस्तात गॅस सिलिंडर बुकिंग करणार असाल तर एक दिलासादायक बातमी आहे. तुम्ही फक्त 634 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर बुक करू शकता. जाणून घेऊया नेमकं कशी असणार प्रक्रिया…
सरकारी इंधन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी स्वस्त सिलिंडरची योजना आणली आहे. महागाईच्या काळात तुम्ही फक्त 634 रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करू शकता. या सिलिंडरचे नाव कम्पोजिट सिलिंडर आहे.
हा 14 किलोच्या सिलिंडरच्या वजनाच्या तुलनेत हलका आहे. हा सिलिंडर एका हातानेदेखील उचलू शकतो. सामान्यपणे घरी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या तुलनेत हा सिलिंडर 50 टक्क्यांनी हलका आहे.
कम्पोझिट सिलिंडर वजनाने हलका आहे. ग्राहकांना या सिलिंडरमध्ये 10 किलो एलपीजी गॅस मिळतो. त्यामुळे या सिलिंडरची किंमत कमी आहे. हे सिलिंडर पारदर्शी आहेत.
हा सिलिंडर तुम्ही फक्त 633.5 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हा सिलिंडर नेता येऊ शकतो. तुमचे कुटुंब छोटे असल्यास हा चांगला पर्याय आहे. हा नवा सिलिंडर गंजणार नाही. त्याशिवाय याचा स्फोटदेखील होणार नाही. हा सिलिंडर पारदर्शी असून ग्राहकांना किती गॅस शिल्लक आहे, हेदेखील समजणार आहे.