बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि आयुष शर्माचा “अंतिम-द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट सध्या खुपच चर्चेत आहे. “भाई का बर्थडे’ आणि “होने लगा’ या गाण्यानंतर चित्रपटातील “चिंगारी’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. यात सलमानची मैत्रीण वलूचा डिसूजा आयटम सॉंग करताना दिसून येत आहे.
सलमानने हे गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. या गाण्यात वलूचा डिसूजा मराठमोळी लावणी करताना दिसून येत आहे. डिसूजाने या गाण्यावर नृत्य करत प्रेक्षकांना मराठमोळ्या अदांचे दर्शन घडवले आहे.
प्रेक्षक तिच्या या नृत्याचे खूप कौतुक करताना दिसून येत आहेत. “चिंगारी’ हे गाणे गायिका सुनिधी चौहानने गायले आहे. तर या गाण्याची कोरिओग्राफी कृती महेश यांनी केली आहे. तर या गाण्याचे बोल वैभव जोशींनी लिहिले आहेत. या गाण्याला हितेश मोडकने संगीत दिले आहे.
“चिंगारी’ पूर्वी “अंतिम’मधील “होने लगा’ हे रोमॅंटिक गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यात आयुष शर्मा आणि महिमा मकवानाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता.