कान्हे, {सोपान येवले} – मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील यात्रेनिमित्त होणारी बैलगाडी शर्यत हायटेक होत चालली आहे. या बैलगाडा शर्यतीसाठी ट्रॅक्टर, जेसीबी, कार, बुलेट अशा लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होताना दिसत आहे.
मावळ तालुक्यात ग्रामीण भागात यात्रेनिमित्त अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजन करण्याची परंपरा आहे. मध्यंतरी काही काळात बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. परंतु, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवली. सध्या बैलगाडा शर्यतीचे स्वरूप बदलून हायटेक झाले आहे. बैलगाडा शर्यतीचे परवानगी देताच नियम व अटीचे पालन करण्याची सक्ती करण्यात येते.
बैलगाडा मालकाकडून गाडा जुपणाऱ्या तरुणांचा आकर्षक गणवेश दिले जातात. सध्याचा जमाना हा ऑनलाइनचा आहे. त्यामुळे खेडोपाडी होणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे लाइव्ह प्रक्षेपण दाखवले जाते. त्यामुळे बैलगाडा शर्यत घरबसल्या पाहता येतात. बैलगाडा शर्यतीमुळै तरुणांना चांगला रोजगार मिळत आहे. धावत्या बैलगाड्याची सेकंड पाण्यासाठी घाटात डिजिटल स्क्रीन ही लावली जाते. तसेच पहाडी आवाजासाठी डिजिटल साऊंड सिस्टिमचा उपयोग केला जातो. त्यातून शर्यतीत रंगत येते.
बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला बळकटी मिळत आहे. या शर्यतीसाठी आता ट्रॅक्टर, जेसीबी, कार, बुलेट अशी आकर्षक मोठी बक्षीसही दिली जातात. दोन ते पाच दिवस तर काही ठिकाणी एक दिवस अशी शर्यतीचे दिवस ठरलेले असतात. त्याचबरोबर वाजंत्री, रसवंतीगृहे, हॉटेल यांना यातून रोजगार मिळू लागला आहे.
ऑनलाइन नोंदणी अन् टोकणही
तसेच अलीकडच्या काळात बैलगाड्या शर्यतीचे नाव नोंदणी टोकन देखील ऑनलाइन पद्धतीने मिळू लागले आहे. याशिवाय वाटपही काही ठिकाणी ऑनलाइन करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यामुळे बैलगाडी मालकांचा वेळ वाचत आहे. तसेच फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यावरही देखील बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.
बदलत्या काळानुसार बैलगाडी शर्यत क्षेत्रात बदल झालेले आहे त्यात ऑनलाइन प्रक्षेपण मधल्या काळात बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने बैल जोडी किमतीत घट झाली मात्र शर्यत पुन्हा सुरू झाल्याने बैल जोडी किमतीची त्याचप्रमाणे झपाट्याने वाढ झाली आहे तसेच अनेक तरुण वर्ग बैलगाडा शर्यतीकडे वळला आहे. गिरीश सातकर, बैलगाडा मालक