मांडवगण फराटा -कुरुळी (ता. शिरूर) येथे आर्थिक फसवणूक झाल्याने नैराश्यापोटी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहुल तडीपार पवार (रा. कुरूळी), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हिराज तडीपार पवार यांनी मांडवगण फराटा दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे.
(दि.3) सायंकाळी सहाच्या सुमारास राहूल याने फेसबुकवर आलेल्या बुलेट मोटारसायकल विक्रीची जाहीरात पाहून त्यावरील मालकाचा फोनवर संपर्क साधला. त्यावेळी त्याने वेगवेगळे कारणे सांगून पैशाची मागणी केली. त्यानुसार राहूल याने 45 हजार रुपये ऑनलाइन त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा केली होती.
त्यानंतर बुलेटची मागणी केली असता उडवाउडवी उत्तरे दिल्याने त्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर (दि. 6) दुपारी राहुल याने सीताराम सखाराम बोरकर यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.