#Budget2019 : संरक्षण क्षेत्रासाठी 3.18 लाख कोटींची तरतूद

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी 3.18 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी संरक्षण क्षेत्रासाठी 2.98 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

संरक्षण क्षेत्रासाठीचा एकूण राखीव निधी 1,08,248 कोटी रुपयांचा आहे. नवीन शस्त्रांची खरेदी, प्लॅटफॉर्म आणि मिलीटरी हार्डवेअरच्या खरेदीसाठी हा निधी राखून ठेवण्यात आला आहे. याशिवाय भत्ते आणि देखभालीच्या कामासाठी गेल्यावर्षी 1,88,118 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला होता.

मात्र यावर्षी 2,10,682 कोटी यावर्षी फेर्बुवारीमधील हंगामी अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठीच्या खर्चासाठी ठेवलेल्या निधीपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष वाढ नाही. 2018-19 च्या अर्थसंकल्पामधील तरतूदीपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 7.93 टक्‍क्‍यांची वाढ करण्यात आली आहे. एकूण खर्चासाठीच्या निधीमध्ये निवृत्तीवेतनासाठीच्या निधीच्या समावेश नाही. निवृत्तीवेतनासाठी 1,12,,079 कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.

निवृत्तीवेतनासाठीच्या निधीसह संरक्षण क्षेत्रासठी तरतूद केलेला एकूण निधी 4.31 लाख कोटी रुपये इतका आहे. 2019-20 च्या एकूण निधीमध्ये निवृत्तीवेतनासाठीची रक्कम 15.47 टक्के इतकी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)