बीएसएनएलची परिस्थिती आणखी बिघडली

नवी दिल्ली – उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे पावणेदोन लाख कर्मचारी असलेल्या बीएसएनएल कंपनीची परिस्थिती आणखी बिघडली आहे.

कंपनीकडे जून महिन्याचे पगार देण्यासाठी पैसे नसल्याचे बोलले जाते. असाच प्रकार फेब्रुवारी महिन्यामध्ये उद्‌भवला होता. त्यामुळे कंपनीने सरकारकडे निधीची मागणी करणारे पत्र पाठविले असल्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुनरुज्जीवनासाठी कंपनीने आपले निवेदन पंतप्रधान कार्यालयात दिले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here