New Corona Virus: सोमवारपासून ब्रिटन बंद करणार सर्व प्रवासी मार्ग

लंडन – कोविडच्या नवीन विषाणूच्या धोक्‍यापासून संरक्षणासाठी ब्रिटन सोमवारी सकाळपासून सर्व प्रवासी कॉरिडोर बंद करणार आहे. दररोज आपण लोकांच्या सुरक्षेसाठी असे कठोर पाऊल उचलत आहोत.

तेव्हा आता अतिरिक्त उपाययोजना करणे अत्यावश्‍यक आहे, असे डाऊनिंग स्ट्रीटच्या पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले. परदेशातून कोणालाही देशात विमानाने येण्यापूर्वी नकारात्मक कोविड चाचणीचा पुरावा दाखवावा लागेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

15 फेब्रुवारीपर्यंत हे नवीन नियम लागू होतील. ब्रिटनमध्ये पहिला करोना रुग्ण सापडल्यापासून 28 दिवसातच करोना विषाणूची बाधा झालेल्या 1,280 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण, 87,291 जणांना करोनाची बाधा झली आहे.

नवीन विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी या कठोर उपाय योजना गरजेच्या आहेत, असेही जॉन्सन म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.