वाघोली – येथील श्री विष्णूजी शेकोजी सातव हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथील सन 2001-2002 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. अनेक वर्षानंतर एकत्र आल्यानंतर शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व मित्र मैत्रिणी पुन्हा एकदा लहान मुलांसारखी मस्ती करण्यात दंग झाले होते.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत वर्षातून एकदा तरी भेट देण्याचा आणि वृक्षारोपण करण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला.
प्राचार्य दत्तात्रय कोतवाल यांनी सूत्रसंचालन केले. रशिकांत आव्हाळे, अजित रामदास आव्हाळे, सचिन प्रकाश उबाळे, कुंडलिक कंद, रतन जाचक, रणजित शिंदे, राजेंद्र ज्ञानेश्वर काळे यांनी आयोजन केले.