Nitish Kumar : गेले दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर आज (दि.२८) अखेर नितीशकुमार नव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदी शपथपबद्ध झाले. यावेळी बिहारचे नवे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा या दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारमध्ये इतर एकूण ८ नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. आज बिहारमधील पाटणा येथे हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
#WATCH | Nitish Kumar takes oath as Bihar CM for the 9th time after he along with his party joined the BJP-led NDA bloc.#BiharPolitics pic.twitter.com/v9HPUQwhl3
— ANI (@ANI) January 28, 2024
नितीशकुमार यांनी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या टर्ममधील त्यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही तिसरी वेळ आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी नितीशकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.