हिंगणा – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांना एका कार्यक्रमात व्यासपीठावर भाषण करताना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. मिटकरी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे योग्य उपचारांमुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमादरम्यान अमोल मिटकरी हिंगणा येथे भाषण करत होते. मंचावर बोलत असताना अमोल मिटकरी यांचा आवाज बदलला आणि हावभाव बदल्यामुळे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.
राष्ट्रवादी काँ. साहित्य कला चित्रपट विभागाच्या विदर्भ अध्यक्ष महागायिका वैशाली माडे काल अकोलादौऱ्यावर होत्या.रा. काँ.पार्टीच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.राष्ट्रवादी काँ. पक्षाचा साहित्य सेल विदर्भात कलावंताच्या पुर्ण पाठीशी आहे.@NCPspeaks@vaishalimade pic.twitter.com/29Ma9fjb4e
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 12, 2021
अमोल मिटकरी यांनी उपाचारनंतर स्वतःच प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. माझ्या प्रकृतीत सुधारणा झाली असून स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येऊ नका अशी विनंती त्यांनी केली आहे. प्रकृती उत्तम असून चिंता करण्याचे कारण नसल्याचेही मिटकरींनी म्हटलं आहे.