तळेगाव दाभाडे – महिलेच्या प्रियकराने महिलेच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा अत्याचार गेली आठ वर्षांपासून तळेगाव दाभाडे येथील अलंकार लॉज, भंडारा डोंगराच्या जंगलात व फिर्यादीच्या इंदोरी येथील राहत्या घरात सुरु होता. याप्रकरणी संबंधित मुलीने तक्रार दिली आहे.
त्यावरून जनार्दन सोमाजी शितोळे (वय 40, रा. बहुळ, मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचारअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शितोळे हा पिडीत मुलीचा प्रियकर आहे.
त्याचे या मुलीच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. पिडीतेला तिची आई व बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत, 2014 पासून त्याने पिडीतेवर विविध ठिकाणी लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराबाबत पिडीतेने मुलीने आईला हा प्रकार सांगितल्यानंतर आरोपवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत आहेत.