कामशेत/टाकवे बुद्रुक – मावळ तालुक्यातील परंदवाडी येथे एका पंधरा वर्षीय मुलाचा व पिंपळोली एका मंडप व्यावसायिक युवकाचा विद्युत वाहक तारेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 3) घडली आहे. ज्ञानदेव कंकाराम मालपोटे, आशू दतराज वर्मा (वय 15, मूळ रा. मध्यप्रदेश) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
परंदवाडी गावच्या हद्दीतील परंदवाडी उर्से रोडवर शुक्रवारी (दि. 4) सकाळी साडेआठ वाजल्याच्या सुमारास सायकल वरून चाललेल्या आशू दतराज वर्मा (वय 15, मूळ रा. मध्यप्रदेश) याचा महावितरणच्या तुटलेल्या विद्युत वाहक तारेस स्पर्श झाल्याने शॉक लागून मृत्यू झाला आहे.
तसेच फळणे येथील मंडप व्यावसायिक ज्ञानदेव कंकाराम मालपोटे हे पिंपळोली येथील ग्रामदैवताच्या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भारुडाच्या कार्यक्रमाच्या मंडप व स्पीकरची व्यवस्था करत असताना विद्युत वाहक तारेचा शॉक लागून ज्ञानदेव मालपोटे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.