पिंपरी -दुकानामध्ये येऊन शिव्या देऊ नका, तसेच टॉयलेट वापरू नका, असे म्हणाल्याने दुकानदाराला मारहाण केली. ही घटना स्वप्ननगरी कॉलनी, टावर लाइन, चिखली येथे 30 नोव्हेंबरला सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली.
गणेश तोरसकर, ओंकार गावढे, लव तसेच एक रिक्षावाल्यावर गुन्हा दाखल केला आहे. अझरुद्दीन नसिब शेख (वय 29, रा. टावर लाइन, चिखली) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. 3) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीचे कटिंगचे दुकान आहे.
आरोपी फिर्यादीच्या दुकानामध्ये येऊन आपसात शिवीगाळी करायचे. फिर्यादीच्या शेजारी असलेल्या टॉयलेटचा वापर करायचे. तुम्ही दुकानामध्ये येऊन शिव्या देऊ नका, तुमच्यामुळे माझे नेहमीचे कस्टमर दुकानामध्ये येत नाहीत. तुम्ही टॉयलेट खराब करता. टॉयलेट मला साफ करावे लागते, असे फिर्यादीने सांगितले.
आरोपींनी त्याचा राग मनात धरून मंडळी जमवली व दुकानामध्ये घुसून फिर्यादीला हातापायाने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीला दुकानाच्या बाहेर घेऊन आले. त्यान आरोपी गावढे याने फिर्यादीच्या डोक्यात मारण्यासाठी फरशी उचलली. मात्र फिर्यादीने तो वार हुकवला. दगडाने मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी जीव वाचवण्यासाठी आरोपींच्या तावडीमधून सुटून पळून गेले.