पुणे – वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी गावोगावी जत्रा आणि उरुसांमधून पुस्तकविक्री करावी, असे मत “डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केले.
“भारतीय विचार साधना फाऊंडेशन’चे अद्ययावत कार्यालय, पुस्तक विक्री केंद्राचे नूतनीकरण आणि पुनर्शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुंटे, रा. स्व. संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, डॉ. गिरीश आफळे उपस्थित होते.
राष्ट्रीय विचारांचा प्रसार करताना पुस्तके महत्वाची भूमिका बजावतात. अशा वेळी जर छोट्या गावपातळीपर्यत ती उपलब्ध झाली तर वाचन संस्कृती आणि सुयोग्य जडणघडण होण्यास मदतच होते, असे डॉ. कुंटे म्हणाले. बौद्धिक विकास करणारे साहित्य निर्माण करत “भाविसा’ आणि वाचकांचे एक नाते तयार झाले आहे. सामाजिक भान जागृत करणारे साहित्य तळागाळापर्यंत पोहोचवायला हवे असे
मत वंजारवाडकर यांनी व्यक्त केले. संदीप गानू यांनी प्रास्ताविक केले.