पुणे – मोबाइलच्या सततच्या वापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत असून पुस्तक घरचा आगळा वेगळा उपक्रम वाचन संस्कृतीला चालना देणारा ठरेल, असा विश्वास पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला. नगरसेवक आनंद रिठे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 37 मध्ये उभारण्यात आलेल्या पुस्तक घराचे उद्घाटन आमदार मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
या पुस्तकघरासाठी स्थानिक नागरिकांनी अडीचशेंहून अधिक पुस्तके दिली आहेत. भाजपचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य बाबाशेठ मिसाळ, नगरसेविका अनिता कदम, स्विकृत सदस्य शशीकांत काळे, पर्वत मतदार संघाचे अध्यक्ष जितेंद्र पोळेकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष विनिया बहुलिकर, प्रशांत दिवेकर, विश्वास ननावरे, चंद्रकांत पोटे यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.