गेले आठवडाभर रशिया-युक्रेन यांच्यात संघर्ष सुरू आहे. युक्रेनवरील आक्रमणामुळे एक रशियन व्यापारी इतका संतापला आहे की त्याने आपल्याच देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना अटक करण्यासाठी किंवा मारण्यासाठी 10 लाख डाॅलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांना ही खुली ऑफर दिली आहे.
उद्योगपती आणि माजी बँकर अॅलेक्स कोन्याखिन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे. कोन्याखिन सध्या अमेरिकेत आहेत. पाश्चात्य देशांतील सरकारे आणि कंपन्यांनी पुतीन यांना आर्थिक शिक्षा करण्याचा प्रयत्न करून रशियन आक्रमणाला प्रत्युत्तर दिले आहे. आता कोन्याखिनच्या या प्रस्तावाने हा विरोध आणखी तीव्र केला आहे.
कोन्याखिन यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांनी पुतीनला रशियन आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत युद्ध गुन्हेगार म्हणून अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे देण्याचे वचन दिले आहे. युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश दिल्याबद्दल रशियन व्यावसायिकाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या डोक्यावर 10 लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे.