मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर त्याच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडेसोबत दिसणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा असणार आहे. पूजा हेगडेच्या वाढदिवसानिमित्त काल या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. शाहिद आणि पूजाचे या चित्रपटातील काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. यातील या दोघांचा अंदाज प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडत आहे. यापूर्वी ती ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसली होत.
प्रोडक्शन हाऊस झी स्टुडिओ आणि रॉय कपूर फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये काही फोटो दिसत आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री पूजा हेगडे आणि शाहिद कपूर एकत्र दिसत आहेत.तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री केक कापताना दिसत आहे.
हे फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, ‘या प्रवासात वाढदिवसाची गर्ल पूजा हेगडे आमच्यासोबत आल्याने आमचा थरारक अॅक्शन-पॅक्ड साहस आणखीनच रोमांचक झाला आहे. आमच्या सुंदर पूजेला आनंद आणि आनंदाने भरलेला दिवस जावो या शुभेच्छा.’
View this post on Instagram
यासोबतच पूजा हेगडेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या सेलिब्रेशनसोबत काही फोटो आणि फोटो शेअर केले आहेत. शाहीद आणि पूजाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रोशन एंड्रयूज करणार आहेत. पूजा हेगडे आणि शाहिद कपूर हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.