Bollywood News : काही काळापूर्वी सलमान खान नवीन हेअरकट करताना दिसला तेव्हा चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. सलमानचा नवा हेअरकट कोणत्या प्रोजेक्टसाठी आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती? यानंतर असे समोर आले की,
सलमानचा लूक एका नवीन चित्रपटासाठी आहे, जो देशभक्तीवर आधारित असेल. या चित्रपटात सलमान निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याचेही समोर आले. आता याच चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट आले आहे. या चित्रपटासाठी सलमानमध्ये कमालीचे परिवर्तन होणार असून, तो अतिशय काटेकोर डाएट फॉलो करणार असल्याचे बोलले जात आहे.
रिपोर्टनुसार, ‘शेरशाह’ दिग्दर्शक विष्णू वर्धन दिग्दर्शित चित्रपटाची तयारी सलमान खानने सुरू केली आहे पैरामिलिट्री अफसरच्या भूमिकेसाठी सलमान कठोर प्रशिक्षण घेत आहे.’
सलमानचे दमदार ट्रेनिंग आणि डाएट
सूत्राने सांगितले की, सलमान जीममध्ये खूप मेहनत घेत आहे आणि त्याच्या आहाराकडेही लक्ष देतोय. या भूमिकेसाठी सलमानला थोडे वजन वाढवावे लागेल, परफेक्ट शेपमध्ये राहावे लागेल.
या चित्रपटासाठी सलमानचे ट्रांसफॉर्मेशन काहीसे ‘सुलतान’ चित्रपटात झाले होते. सलमानला आता त्याच्या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत काहीतरी नवीन करून पहायचे आहे, आणि त्यामुळे तो एका नव्या झोनमध्ये जात आहे. सूत्राने सांगितले की, हा चित्रपट मालदीवमधील १९८८ च्या बंडावर आधारित आहे, जो भारतीय लष्कराच्या मदतीने उधळून लावला होता. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
सलमान खान फायनल झाला असून, अभिनेत्रीचा शोध सुरु आहे. निर्माते यासाठी बॉलिवूड अभिनेत्री नाही तर दक्षिण भारतीय अभिनेत्रीला कास्ट करण्याचा विचार करत आहेत. सध्या समंथा रुथ प्रभूचे निर्मात्यांच्या लिस्टमध्ये आहे.