बॅक-टू-बॅक ब्लॉकबस्टर्स चित्रपट देणारा बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचा किंग ठरला आहे. अक्षयसाठी 2019 हे वर्ष खूप चांगले राहिले. गतवर्षी त्याचे केसरी, मिशन मंगल, हाऊसफुल 4 आणि गुड न्यूज सारख्या चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत अन्य कलाकारांना मागे टाकले. अक्षयच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एकूण 665.89 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
अक्षयने 2019ची दमदार सुरुवात केली. मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या “केसरी’ चित्रपटाने सुमारे 151.87 कोटींची कमाई केली होती. “केसरी’च्या यशानंतर अक्षय आणि विद्या बालन यांच्या “मिशन मंगल’ या अंतराळ मोहीमेवरील चित्रपटालाही प्रेक्षकांनी भरभरून दिले. “मिशन मंगल’नेही 100 कोटींच्या क्लबमध्ये सहज प्रवेश केला आणि एकूण 192.66 कोटी कमावले.
या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर “हाऊसफुल’ फ्रॅंचायझीचा चौथा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आला. या विनोदी चित्रपटाने 205.60 कोटींच्या उलाढालीसह गतवर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्यानंतर अक्षयच्या “गुड न्यूज’ चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत 115.75 कोटी कमावले. अक्षयने या चार चित्रपटांमधून आतापर्यत एकूण 665.89 कोटींची कमाई केली आहे.