मुंबई – राज्यभरात सध्या गणपतीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा या निवासस्थानी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 24 सप्टेंबर रोजी एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अभिनेता सलमान खान, (Salman khan) शाहरुख खान (ShahRukh Khan) जॅकी श्रॉफसह अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते.
वर्षा बंगल्यावर सलमानसह त्याची बहीण अर्पिता आणि आयुष शर्माही उपस्थित होते. तर शाहरुखसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी होती. यावेळी शाहरुखने निळ्या रंगाचा पठाणी सूट घातला होता. तर सलमानने लाल रंगाचा कुर्ता घातला होता. दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटोही काढले. विशष म्हणजे गायिका आशा भोसले देखील मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी आल्या होत्या.
यासोबतच अर्जुन रामपाल, खुशी कपूर, भूषण कुमार, जॅकी श्रॉफ, विनोद भानुशाली, शरद केळकर, सुनील शेट्टी, पंकज त्रिपाठी यांसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व सेलिब्रिटींचे मनापासून स्वागत केले.