मुंबई – बी-टाऊन घरे काचेच्या वाड्यांसारखी आहेत. बाहेरून स्वच्छ आणि सुंदर तर आतून खोल आणि गडद. या वाड्यांमध्ये दररोज काही ना काही वाद सुरू असतात. पूर्वी तारे स्वतः त्यांच्या वादात अडकत असत आणि आता त्यांची मुलेही ही प्रथा पुढे नेत आहेत.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर सगळ्याच स्टार किड्सना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहेत. अशी अनेक स्टार किड्स आहेत ज्यांचे संबंध आधीच वादांशी जोडलेले आहेत. असे असले तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनने वडिलांना गर्व वाटावा असे काम केले आहे.
आर माधवने बॉलिवूडशिवाय तमिळ चित्रपटांमध्येही आपल्या अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचे मने जिंकले त्याच प्रमाणे वेदांतनेही बेंगळुरु येथे नुकत्याच झालेल्या ज्युनियर नॅशनल ऍक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्रासाठी सात पदके जिंकली आहेत. त्यांचा या यशामुळे सध्या सोशलवर त्याचे चांगलेच कौतुक केले जात आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, वेदांतने मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग, मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग, मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग आणि × मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग रीलेमध्ये कांस्य पदक. मीटर, मीटर आणि मीटर फ्रीस्टाइल स्विमिंगमध्ये त्याला रौप्य पदक मिळालं आहे.