मुंबई – अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मागील वर्षी आयराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली. यावेळी भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार उपस्थित राहिले होते. एंगेजमेंटनंतर नुपूर विवाहबंधनात कधी अडकणार? असा सवाल अनेक जण उपस्थित करत होते. अखेर आयराच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच आयरा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
आयरा पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये लग्न करणार आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहिती नुसार, आयरा आणि नुपूर शिखरे 3 जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहेत. कोर्ट मॅरेजनंतर राजस्थानच्या उदयपूरमध्ये पूर्ण रितीरिवाजांसह सेलिब्रेशन होणार आहे. या लग्नाची आमिरच्या घरी तयारी देखील सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. आयरा आणि नुपूरच्या लग्नाचा कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे आणि लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी फक्त कुटुंब आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबत आयराकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आयरा ही आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आहे. आयरा खान सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. आयराचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. दरम्यान, दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा हे जोडपे देखील येत्या 24 सप्टेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये बहुतांश सोहळे होणार आहेत. मात्र तरी विवाह सोहळ्याचे ठिकाण ताज तलाव असणार आहे. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता परिणीतीच्या चुरा समारंभाने या सेलिब्रेशनची सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातच आता आयरा देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.