बांगलादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना तिचा मृतदेह एका पुलाजवळ गोणीत सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती शाखवत अली नोबल याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. ढाका पोलिसांनी आपल्या अधिकृत निवेदनात अभिनेत्रीच्या हत्येमागील कारण कौटुंबिक वादाचा हवाला दिला आहे. मात्र, कोणीतरी आपल्या प्रिय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गुन्हेगारीच्या इतिहासात अनेकवेळा संबंध तोडून हत्या करण्यात आल्या आहेत. या हत्या केवळ सर्वसामान्यांच्याच झाल्या नाहीत तर अनेक बॉलिवूड कलाकारांनाही मृत्युदंड देण्यात आला. चला तर, पाहुयात कोणत्या अभिनेत्रींसाठी त्यांचे जीवलगच बनले यमदूत.
– मीनाक्षी थापर
मीनाक्षी थापर यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. नायिका’ चित्रपटात ती एक छोटीशी भूमिका साकारत होती. तेव्हा मित्रांनीच तिचे अपहरण करून शिरच्छेद केला होता. अभिनेता अमित जैस्वाल आणि त्याची मैत्रीण प्रीती सुरीन यांनी मीनाक्षीचे अपहरण केले होते. खंडणी न दिल्याने अभिनेत्रीची गोरखपूरमध्ये निर्घृण हत्या करून तिचा शिरच्छेद करण्यात आला होता. तिचे धड एका पाण्याच्या टाकीत सापडले तर शीर बसमधून मुंबईच्या रस्त्यांवर फेकण्यात आले होते.
– शशिरेखा
शशिरेखा ही तमिळ टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री होती पण तिच्याच पतीने तिची हत्या केली. वास्तविक शशिरेखा यांचे पती रमेश शंकर यांचे दुसऱ्या एका महिलेशी (व्यवसायाने अभिनेत्री) अफेअर होते. दोघांच्या प्रेमात शशिरेखा आड येत होती, त्यामुळे या भीषण हत्येचा कट रचला गेला. अभिनेत्री शशिरेखा यांचे पती रमेश शंकर याने तिचा शिरच्छेद केला होता. रमेश शंकर आणि त्याच्या लिव्ह-इन पार्टनरने शशिरेखाचे प्रेत दोन दिवस बाथरूममध्ये कोंडून ठेवले आणि नंतर तुकडे करून फेकून दिले आणि संधी पाहून मृतदेहाची विल्हेवाट लावली.
– लैला खान
अभिनेत्री लैला खान उर्फ रेश्मा पटेल हिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. लैला खानची आई सेलिना यांची मुंबईत करोडोंची संपत्ती होती. एके दिवशी लैला अचानक गायब झाली. लैलाच्या आईचा तिसरा नवरा परवेझ याने पैशासाठी संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर दीड वर्षानंतर लैलाच्या कुटुंबीयांचे मृतदेह त्यांच्या फार्महाऊसमधून सापडले.
– प्रिया राजवंश
अभिनेत्री प्रिया राजवंशचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हते. प्रियाच्या फिल्मी करिअरची सुरुवात अतिशय नेत्रदीपक असली तरी तिचा शेवट खूप भीतीदायक होता. मालमत्तेसाठी चेतन आनंदच्या दोन्ही मुलांनी प्रियाची हत्या केली. शवविच्छेदन अहवालात प्रिया राजवंशचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
– कंदील बलोच
पाकिस्तानी अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी कंदील बलोचची 2016 मध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर दुसऱ्या दिवशी, बलूचचा भाऊ मोहम्मद वसीम याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ आणि विधाने करून ‘बलूच’ कुटुंबाचे नाव बदनाम केल्यामुळे त्याने बलुचची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.