सहा हजारांहून अधिक “ई-मोटरसायकल’ची नोंदणीपिंपरी, दि. 22 (प्रतिनिधी) – पर्यावरणपूरक वाहनांची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. शहरामध्ये गेल्या वर्षभरात सुमारे तीन हजार ई-मोटारसायकलची नोंदणी वाढली आहे. म्हणजे 2020 च्या तुलनेत गेल्या वर्षभरात जवळपास नोंदणीत चौपट वाढ झाली आहे. तर, इलक्ट्रिक कारच्या नोंदणीत जवळपास पाचपटीने वाढ झाली आहे.
उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आत्तापर्यंत ई-मोटारसायकल, ई-कार, ई-थ्री व्हिलर टेम्पो अशा इलक्ट्रिकमधील एकूण 7 हजार 133 वाहनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये एकूण 6 हजार 389 ई-मोटारसायकलच्या नोंदणीचा समावेश आहे. 2019 मध्ये केवळ 453 इलक्ट्रिक मोटारसायकलची नोंदणी झाली होती. 2020 मध्ये ही संख्या वाढून 1020 इतकी नोंदणी झाली. तर, 2021 या वर्षात तब्बल 3 हजार 977 ई-मोटारसायकलची नोंदणी झालेली आहे. म्हणजेच 2 हजार 957 मोटारसायकलची नोंदणी वर्षभरात वाढली आहे. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये जवळपास चौपट नोंदणी वाढली आहे. तर, गेल्या 21 दिवसात 480 ई-मोटारसायकलची नोंद झाली आहे. उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे एकूण 478 इलक्ट्रिक कारची नोंदणी झालेली आहे.
इलक्ट्रिक कारची नोंदणी करण्याचे प्रमाण कमी असले तरी 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये जवळपास पाचपटीने नोंदणी वाढली आहे. 2020 मध्ये केवळ 67 इलक्ट्रिक कारची नोंदणी झाली होती. तर, 2021 मध्ये 320 इलक्ट्रिक कारची नोंदणी झाली. गेल्या 21 दिवसात 10 इलक्ट्रिक कारची नोंदणी करण्यात आली आहे. 2019 मध्ये एकाही इलक्ट्रिक थ्री व्हिलर टेम्पोची (मालवाहतूक) नोंद झालेली नव्हती.
2020 मध्ये 81 इलक्ट्रिक थ्री व्हिलर टेम्पापर्यावरणपूरक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात आत्तापर्यंत इलक्ट्रिकमधील एकूण 7 हजार 133 वाहनांची नोंद झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 6 हजार 389 ई-मोटारसायकल आहेत. तर, 478 इलक्ट्रिक कारचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त अन्य प्रकारातील वाहनांचीही नोंद झाली आहे.
– अतुल आदे,
उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी.