दिल्ली – येथील प्राणिसंग्रहातील एका वाघिणीचा मृत्यू झाला असून तिच्या रक्ताचे नमुने आता कोरोना तपासणीसाठी बरेली येथे पाठवण्यात आलेत. बुधवारी कल्पना नामक या १४ वर्षीय वाघिणीचा मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यू झाला होता. यानंतर प्राणिसंग्रहालयातील आधिकाऱ्यांनी तिच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर गुरुवारी तिला दफन केले. आता हे नमुने बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संस्थेकडे पाठवण्यात आले असून येथे कल्पना वाघिणीच्या रक्ताची कोरोना तपासणी होणार आहे.
तत्पूर्वी, सर्वप्रथम अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयात ४ वर्षीय वाघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. भारतामध्ये देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून यामुळे देशातील सर्वच प्राणिसंग्रहालयांमध्ये मानवी संपर्क टाळून प्राण्यांची काळजी घेण्यात येत आहे. अशातच कल्पना वाघिणीचा मृत्यू मूत्रपिंड विकाराने झाला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून या वाघिणीच्या रक्ताच्या नमुन्यांची कोरोना चाचणी होणार आहे.