पुणे – हिवाळा सुरू झाला की, शहरातील जलस्रोतांवर विविध स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते. अशाच एक स्थलांतरित पक्षी असलेला, लांब चोच, कृष्ण-धवल शरीर, गुलाबी पाय असलेल्या शेकाट्या पक्ष्यांचे थवे मुठा नदीपात्रात दाखल झाले आहेत. या पक्ष्यांचे वास्तव्य परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.