मांजरी :- मांजरी बुद्रुक गावाचा पालिकेत समावेश होऊन दीड वर्षाच्या वर कालावधी लोटला आहे. पालिकेने करापोटी मिळकतदारांकडून काही कोटी रूपयांची वसूलीही केली आहे. मात्र, रस्ते, पाणी, वीज यांसारख्या पायाभूत चांगल्या सुविधांही सध्या महानगरपालिका पुरवू शकत नाही. पालिका प्रशासनाला त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी येथील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांकडून महापालिकेसमोर “चला जाब विचारू’ आंदोलन करण्यात आले.
माजी सरपंच पुरूषोत्तम धारवाडकर म्हणाले की भरमसाठ कर आकारूनही कोणत्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही. सामान्य नागरिकांची त्यातून फसवणूक पालिका फसवणूक करीत आहे.
मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना सध्या पाणी, रस्ते व पथदिव्यांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकवेळा मागणी करूनही प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सध्या गावात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पथदिवे बंद पडले आहेत. परिसरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. कालव्यात व नदीपात्रात मोठ्याप्रमाणात जलपर्णी वाढून त्यावरील डासांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आज सुमारे एक हजार नागरिकांचा मोर्चा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर काढण्यात आला.
“मांजरी बुद्रुक गावाचा महापालिकेत समावेश होऊन 18 महिने झाले आहेत. असे असताना आतापर्यंत पालिकेच्या माध्यमातुन गावामध्ये कुठल्याही प्रकारची ठोस विकासकामे तसेच नागरिकाच्या प्राथमिक कोणत्याही गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे माजरीतील नागरिकांना महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतच बरी होती ,असे म्हणण्याची वेळ आली आहे. रस्ते,लाईट,पाणी आणि वाढीव मिळकत करात सवलत या आमच्या मागण्या आहेत. त्यासाठी आंदोलन केले आहे. याची दखल घेतली गेली नाही तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल.”
-शिवराज घुले(माजी सरपंच, मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत)
या मोर्चाचे नेतृत्व माजी सरपंच शिवराज घुले, माजी सरपंच अण्णा धारवाडकर, भाजप हडपसर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संदीप दळवी, माजी उपसरपंच सुमित घुले, समीर घुले, उज्वला टिळेकर,निर्मला म्हस्के, बाळासाहेब घुले, शैलेंद्र बेल्हेकर, सत्यवान घुले, सीमा शेंडे, छाया गदादे, गौरव म्हस्के, गणेश गायकवाड,बाळासाहेब राऊत, सागर प्रभुणे,विद्याधर भोसले तसेच अनेक कार्यकर्ते महिला, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
Baramati : “कार्यकर्ते पद घेतात अन् नंतर पक्षाला…”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
दरम्यान, आंदोलनातील प्रमुखांनी कर आकारणी व करसंंकलन उपायुक्त अजित देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले.