रांची – मोलकरणीला एका खोलीत कोंडून ठेवत तिची प्रचंड छळवणूक केल्या प्रकरणात भारतीय जनता पार्टीने झारखंडमधील आपल्या एका महिला नेत्याला पक्षातून निलंबित केले आहे. सीमा पात्रा हे तिचे नाव असून ती भाजपच्या महिला शाखेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्य आहे.
तिचा पती एक निवृत्त आयएएस अधिकारी आहे. सीमा पात्रावर छळवणूक केल्याचा आरोप करत मोलकरणीने तो व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. संबंधित महिला आता रूग्णालयात दाखल असून तिला झालेल्या प्रचंड मारहाणीत तिचे दात पडल्याचे आणि तिला अन्य जखमा झाल्याचे दिसून येते आहे. तब्बल आठ वर्षांपासून हा अत्याचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
तिला बसताही येत नसून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांनी सीमा पात्राला अटक करण्याची मागणी केली आहे. (BJP women leaders torturing maid; Expelled by the party )