नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्यांनी आमच्या सात आमदारांना प्रत्येकी २५ कोटी रूपये देऊ केले आहेत असा जो आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्याच्या विराेधात भाजप पोलीस तक्रार करणार आहे, असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले आहे.
सचदेवा म्हणाले की, विरोधी पक्षनेते रामवीर बिधुरी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आमदारांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी दिल्ली पोलिस आयुक्तांना भेटेल आणि आरोपांची निष्पक्ष चौकशी सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे तक्रार दाखल करेल.
आप आणि केजरीवाल यांनी देखील त्यांच्या आमदारांची भाजपकडून शिकार होत असल्याचे प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला मदत करावी, असे सचदेवा म्हणाले.