18 कोटी सदस्य संख्या करण्याचे उद्दिष्ट – नड्डा
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे सध्या देशभरात 11 कोटी सदस्य असून आणखिन सात कोटी नविन सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट आमच्या समोर आहे. असे वक्तव्य भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी केले आहे.
या विषयी बोलताना नड्डा म्हणाले की, देशभारात आम्ही नविन सात कोटी सदस्य आमच्या पक्षाशी जोडू इच्छितो. ज्यामुळे आमच्या पक्षाचे देशभरात 18 कोटी सदस्य होतील. सध्या देशभरात सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला आम्हाला भरभरुन प्रतिसाद लाभला आहे. ज्या द्वारे आम्ही तब्बल 11 कोटी सदस्य पक्षाशी जोडले आहेत. आता हीच संख्या आम्हाला लवकरात लवकर 18 कोटींवर न्यायची आहे.
तसेच त्यांनी यावेळी सांगितले की, भाजपामध्ये नविन सदस्यांच्या नोंदणीस पश्चीम बंगाल आणि काश्मीरमध्ये देखील चांगला प्रतिसाद लाभला असून त्यामुळे आम्ही खुप खुश आहोत.