लखनौ – पाच राज्यातील निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर उत्तर प्रदेशात फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. आधी भाजपच्या दोन मंत्र्यांसह पाच आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. भाजपला हा मोठा धक्का मानला जात होता. मात्र भाजपने देखील यावर पलटवार केला आहे.
भाजपने समाजवादी पक्षासह काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. समाजवादी पार्टीचा विद्यामान आणि एक माजी आमदार तसेच काँग्रेसच्या एका विद्यमान आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Congress MLA from Behat (Saharanpur) Naresh Saini, Sirsaganj (Firozabad) MLA Hari Om Yadav, and former SP MLA Dr Dharmpal Singh join BJP in presence of senior Uttar Pradesh BJP leaders in Delhi pic.twitter.com/9LWh0KPQXO
— ANI (@ANI) January 12, 2022
बेहाटचे काँग्रेसचे आमदार नरेश सैनी, सिरसागंज मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे आमदार हरिओम यादव आणि माजी आमदार धरमपाल यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.