भाजप वन मॅन शो, टू मॅन आर्मी – शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली – भाजप वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी झाली असल्याची टीका आज शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर केली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी आज अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले कि, भाजपमध्ये लोकशाहीचे रुपांतर हुकूमशाहीत झाले आहे. मी आजवर देशहिताच विचार केला आहे. माझ्या स्वत:साठी काही मागितलं नाही. भाजपमधील दिग्गज नेत्याना अपमान झाला आहे. आज भाजप वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी झाली आहे. मोदी सरकारमधील अनेक मंत्रीदेखील घाबरलेले आहेत. सरकारमधील सगळे निर्णय पंतप्रधान कार्यालयातून घेतले जातात, असा आरोपही शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. आज भाजपचा स्थापना दिवस आहे. आजच्याच दिवशी मी भाजपमधून बाहेर पडत आहे. याचे मला जास्त दु:ख होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा पटनासाहिबमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.