नीरव मोदीच्या कोठडीला 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

लंडन : पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणातला हिरे व्यापारी आरोपी नीरव मोदीला आज वेस्टमिन्स्टर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने कोठडीचे आदेश दिले. याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी त्याला 30 जानेवारी ही तारीख देण्यात आली आहे.

यापूर्वी नोव्हेंबरमधे जामिनासाठी त्याने केलेला अर्जही फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला होता. कोठडीच्या 28 दिवसांची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
दहशतवादी संशयितांवर लादल्या गेलेल्या सदस्यांप्रमाणेच, तसेच मार्चमधील अटकेनंतर वॅन्ड्‌सवर्थ कारागृहात राहिल्याने आपले मानसिक आरोग्य खालावल्याच्या मुद्‌द्‌यांवर त्याने जामिनाची मागणी केली होती.

मात्र मे 2020 मध्ये त्याच्या प्रत्यार्पणाच्या खटल्यासाठी साक्षीदारांना धमकावणे आणि न्यायालयात आत्मसमर्पण न करण्याच्या सततच्या भीतीमुळे मुख्य न्यायाधीश एम्मा अरबथनॉट यांनी ही जामीन याचिका फेटाळली.
त्याच्या प्रत्यार्पणच्या खटल्याची सुनावणी 11 मे रोजी होणार आहे. ही सुनावणी 5 दिवस चालण्याची शक्‍यता आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.