नवी दिल्ली – छट पूजेच्या मुद्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करणारे भाजपनेते मनोज तिवारी जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पाण्याचं टँकर सुरू असताना बॅरेकेट्स खाली पडल्यामुळे मनोज तिवारी यांना दुखापत झाली. त्यांना दिल्ल्तील सफरदगंज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
दिल्लीतल सार्वजनिक ठिकाणी छठ पूजा कऱण्यास मज्जाव करण्यात आला आहे. डीडीएमने करोना स्थिती पाहता, सार्वजनिक ठिकाणी छट पूजा करण्यास बंदी घातली आहे. यावरूनच मनोज तिवारी आक्रमक झाले आहे. दुसरीकडे दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी उत्सव भव्य पद्धतीने साजरे करणार असल्याची घोषणा केली आहे.