मुंबई – राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील जॉनी लिव्हर आहे असा पलटवार राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर केला आहे. कालच्या सभेत राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाडवर त्यांची नक्कल करीत टीका केली होती त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा पलटवार केला आहे.
आव्हाड म्हणाले की सध्या स्टॅंडअप कॉमेडियनची जागा शिल्लक आहे. ती त्यांनी घ्यावी. राज ठाकरे हे कायम इतरांच्या शारीरीक ठेवणीवर टीका करीत असतात. इतरांच्या रंगावरून, नाकावरूनही ते टीका करीत असतात. त्यांच्यात वर्णद्वेष ठासून भरला आहे.
त्यामुळेच ते अशा प्रकारची टीका करीत असावेत असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. शाब्दिक कोट्या आम्हीही करू शकतो. पण मला इतक्या खालच्या पातळीवर उतरायचे नव्हते पण त्यांनीच यासाठी मला भाग पाडले आहे असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या व्यासपीठावर एक नवीन जॉनी लिव्हर जन्माला आला आहे या नव्या जॉनी लिव्हरला खूप शुभेच्छा असा टोमणाही आव्हाडांनी मारला आहे.