नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि समाजवादी पक्षाचे (सप) संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या विरोधातील उमेदवार जाहीर केले. उत्तरप्रदेशच्या रायबरेलीमधून सोनिया, तर मैनपुरीमधून मुलायम निवडणूक लढवत आहेत. त्या मतदारसंघांमध्ये भाजपने अनुक्रमे दिनेशप्रताप सिंह आणि प्रेमसिंह शाक्य यांना उमेदवारी दिली. दिनेशप्रताप यांनी मागील वर्षी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. मुलायमपुत्र आणि सपचे अध्यक्ष अखिलेश यादव आझमगढमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने भोजपुरी अभिनेते आणि गायक दिनेशलाल यादव यांना मैदानात उतरवले. केंद्राची सत्ता राखण्याच्या मोठ्या आव्हानाला सामोऱ्या जात असलेल्या भाजपने आतापर्यंत लोकसभेच्या 383 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.