नेवासा – (राजेंद्र वाघमारे) : लोकसभा निवडणूकीचे राज्यातील सर्व टप्पे संपले आहेत. जय – पराजयाचे कोडे ४ जुनला संपुष्ठात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आपापल्या मतदार संघात कोणी – कोणाचे काम केले आणि कोणी कोणाला मदत केली? आणि कोणाला विरोध? हा राजकिय अभ्यास आता लोकसभेच्या उमेदवारांनी सुरु केला आहे.
उमेदवारांकडून हे काम आपल्या मतदार संघनिहाय तालुका पातळीवर सुरु केले आहे. लोकसभा उमेदवारांची यंदाची संधी आता संपली आहे, मात्र काही महिन्यातच विधानसभा येऊ घातल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी ज्यांच्या विरोधात शिर्डी मतदार संघात मदत आणि विरोध? केला. त्यांच्यासाठी आता विजयी लोकसभेचे उमेदवार आणि पराभूत उमेदवार आपला उट्टा काढण्यासाठी ज्या – त्या मतदार संघात जादूची कांडी फिरवून राजकिय हिशोब चुकता करण्यासाठी राजकिय मैदानात उतरणार आहे.
या सर्व प्रकारावरून आता सर्व राजकीय परिस्थितीत आता आली रे…आली आता तुझी बारी आली…चा नारा देण्यात येत आहे. लोकसभेतील विजयी आणि पराभूत उमेदवार शिर्डीच्या राजकीय रणांगण गाजवणार आहे. ज्या-त्या, नेत्यांचे वाभाडे काढण्यास राजकारणी पुन्हा एकदा मैदानात उतरुन परतफेड करणार आहेत. त्यामुळे “मौका सभी को मिलता है! चा, प्रत्यय विधानसभा निवडणूकीत होणार आहे. त्यासाठी लोकसभेतील उमेदवार चांगलेच धार लावून बसल्याचे चिञ राजकीय आखाड्यात स्पष्टपणे दिसून येत आहे.