एकनाथ खडसे, विनोद तावडेंना तिकिट नाही
मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजपने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांच्या ऐवजी त्यांच्या मुलीला म्हणजे रक्षा खडसेला पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे राज्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना चौथ्या यादीतूनही डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागेवर भाजपचे सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपच्या चौथ्या यादीत सात उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. त्यात मुक्ताईनगरमधून रक्षा खडसे, रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना कुलाब्यातून, चरण सिंह ठाकूर यांना काटोलमधून , तुमसर प्रदीप पडोले, नाशिक-पुर्व राहुल थिकले, बोरीवलीमधून सुनील राणे, घाटकोपरमधून पराग शहा अशा सात उमेदवारांना भाजपच्या चौथ्या यादीत स्थान मिळाले आहे.