दुर्दैवी : वाढदिवस साजरा करायला गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

नागपूर – वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या बाप -लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना नागपुरातील झिल्पी तलावात घडली. वडील अब्दुल शेख (35 ) आणि मुलगा शबील शेख (12) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोगर कोसळलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील टिपू सुल्तान चौकात राहणारे शेख दाम्पत्य आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी झिल्पी तलावावर गेले होते. यावेळी वडील आणि मुलगा तलावात उतरले तर आई ही पाण्यात उतरण्याच्या तयारीत असताना वडील आणि मुलगा दोघे बुडू लागले. मुलाच्या आईने आरडा ओरडा करत पाण्यात धाव घेत त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र दोघांना वाचवण्यात यश आले नाही.

पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुलाच्या वाढदिवसादिवशीस बाप-लेकाचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अधिक तपास हिंगणा पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.