पुणे – मासळीची आवक निम्म्याने घटली आहे. मार्गशीर्ष महिन्यामुळे मागणीही नसल्याने भावात 20 टक्क्यांनी वाढ झाली. करोनानंतर आता बर्ड फ्लूचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे चिकनला मागणी कमी झाली आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत भाव 20 रुपयांनी घटले.
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे अंडी आणि मटणाचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी आणि प्रभाकर कांबळे यांनी दिली.
गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची सुमारे 8 ते 15 टन, खाडीची सुमारे 100 किलो, तर नदीच्या मासळीची 1 ते दीड टन आवक झाली. आंध्र प्रदेशातून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 12 ते 14 टन इतकी आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)
पापलेट : कापरी : 1500-1600 मोठे 1400, मध्यम : 1000, लहान 700-800, भिला : 600, हलवा : 550, सुरमई : 500-550, रावस : लहान 550, मोठा : कट 750, घोळ : 600, भिंग : 400, करली : 280, करंदी : सोललेली 440, पाला : लहान 700-800, मोठे : 1200-1400, वाम : लहान 550, मोठी 700-750, ओले बोंबील : 160-200, कोळंबी : लहान 280, मध्यम : 400-480, मोठे : 600, जंबोप्रॉन्स : 1200, किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1000-1200, मोरी : 280, मांदेली : 100-140, राणीमासा : 200, खेकडे : लाल : 280, चिंबोऱ्या : 600. खाडीची मासळी : सौंदाळे : 240-280, खापी : 240-280, नगली : लहान 360, मोठी 600-700, तांबोशी : 400, पालू : 280, लेपा : लहान 140-160, मोठे 240-280, शेवटे : 240, बांगडा : लहान 200, मोठे : 280, पेडवी : 100, बेळुंजी : 160
तिसऱ्या : 240-280, खुबे : 140, तारली : 200, नदीची मासळी : रहू :160, कतला :160, मरळ : 400-480, शिवडा : 240-280, खवली : 240, आम्ळी : 160, खेकडे : 200, वाम : 550.
चिकन : चिकन : 180, लेगपीस : 220, जिवंत कोंबडी : 140, बोनलेस : 280.
अंडी : गावरान : शेकडा : 850, डझन : 120, प्रतिनग : 10,
इंग्लिश : शेकडा : 490, डझन : 66, प्रतिनग : 5.50
मटण : बोकडाचे : 640, बोल्हाईचे : 640, खिमा : 640, कलेजी : 640.