Firing At Salman Khan Bandra House| बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे. तपासानंतर सलमानच्या घराला लक्ष्य करून गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आता गुन्हे शाखा सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा गोळीबार झाला तेव्हा सलमान खान त्याच्या घरीच होता. गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे. फॉरेन्सिक टीमला बाल्कनीत गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत. मुंबई पोलिसांना एक सीसीटीव्ही सापडला आहे. यानंतर गोळीबार करणाऱ्या दोघांचे फोटो समोर आले आहेत.
दरम्यान, अश्यातच या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली बिश्नोई गँगने स्वीकारली असून यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा केला आहे. अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीने आपण या गोळीबारामागे असल्याचे मान्य केले आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत या गँगने याबद्दल खुलासा केला आहे.
अनमोल बिश्नोईने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली Firing At Salman Khan Bandra House|
अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘तुला आमची ताकद समजावी यासाठी हे केलं आहे. तुला ही शेवटचा इशारा आहे. यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडणार नाही’, असे या पोस्टमध्ये लिहिले आहे. मात्र हे अकाउंट फेसबुक वर सर्च केलं जाऊ शकत नाही. अकाउंटबाबत रिस्ट्रीक्शन्स आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी याची सत्यता पडताळून पाहत आहेत.
एका आरोपीची ओळख पटली Firing At Salman Khan Bandra House|
समोर आलेल्या फोटोनंतर एका आरोपीची ओळख पटली असून यातील लाल टी-शर्टमधील संशयित विशाल उर्फ काळू आहे. त्याचे नाव आधीपासूनच गुरुग्राममधील भंगार व्यापारी सचिनच्या हत्येनंतर फरार आरोपींच्या यादीत आहे. तो बिश्नोई गँगच्या राजस्थानस्थित गुंड रोहित गोदारासाठी शूटर म्हणून काम करतो.
हेही वाचा: