पुणे – भाजपचे जेष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची तब्येत अचानक बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट आजारी होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरु आहेत.
गिरीश बापट आजारी असल्यामुळे त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यामुळे त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते. बुधवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना दाखल केले असल्याचे समाजते.
आजारी असूनही पक्षासाठी उतरले होते प्रचारात
भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. यावेळी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. यावेळी प्रकृती ठीक नसतानाही गिरीश बापट यांनी रसानेंसाठी प्रचार केला होता. त्यावेळी देखील ते उपचार घेत होते.
बातमी अपडेट होत आहे सविस्तर वृत्त थोड्या वेळात…