लखनौ – एटा जिल्हा प्रशासनाने मंगळवारी दुपारी एमएलसी निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या दोन्ही उमेदवारांच्या शपथपत्रात त्रुटी असल्याचं सांगत उमेदवारी अर्ज रद्द केले. सुभाषवादी भारतीय समाजवादी पक्षाचे उमेदवार अनुज कुमार यांचाही उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. यामुळे भाजपचे उमेदवार ओमप्रकाश सिंह आणि आशिष यादव यांची बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन सदस्यांच्या मथुरा-एटा-मैनपुरी स्थानिक प्राधिकरण जागेसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी भाजप, सपासह पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. सपा उमेदवार उदयवीर सिंग आणि राकेश सिंग यादव यांनी प्रत्येकी एका सेटमध्ये निवडणूक अधिकारी डीएम अंकित अग्रवाल यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. तर भाजपचे उमेदवार ओमप्रकाश सिंह आणि आशिष यादव यांनी अर्ज दाखल केले. मंगळवारी उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाली.
उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने प्रतिज्ञापत्रातील त्रुटी सांगून उदयवीर सिंग आणि राकेश सिंग यादव यांचे उमेदवारी अर्ज रद्द केले. त्याचबरोबर सुभाषवादी समाजवादी पक्षाचे उमेदवार अनुज कुमार यांचाही अर्ज फेटाळण्यात आला. अशा स्थितीत मथुरा-एटा-मैनपुरी या जागेवर भाजपचे उमेदवार आता दोन सदस्य पदांसह बिनविरोध निवडून येणार आहेत.
दरम्यान मंगळवारी उमेदवारी अर्ज छाननीवेळी गोंधळ झाला होता. यावेळी सपा उमेदवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे.