वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी 2024 ची अध्यक्षीय निवडणूक लढवण्याचे सूतोवाच केले आहे. मात्र या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर करण्याची तयारीही आपण केलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. ईस्टरच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचे सूतोवाच केले.
2024 च्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे, असे बायडेन म्हणाले. अध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस या दोघांनीही 2024 ची निवडणूक लढवण्याची आपली तयारी असल्याचे म्हटले आहे, मात्र अद्याप ही अधिकृत घोषणा त्यांनी केलेली नाही.
बायडेन यांच्या फेरनिवडीसाठी व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांकडून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. डेमोक्रॅटिक प7ाकडून उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय जवळपास पक्का झालेला आहे. मात्र त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे, असे काही सूत्रांच्या आधारे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.