भुलेश्वर – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील भुलेश्वर मंदिर हे एक महाराष्ट्रात जागृत देवस्थान आहे. पुणे जिल्ह्यात शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून हे मंदिर ओळखले जाते. येथे नेहमीच भाविक, पर्यटक आणि शिल्प कला अभ्यासकांची गर्दी असते. सध्या सुट्ट्यांचे दिवस असल्याने याठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे.
दरम्यान, भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला भारतीय पुरातत्व विभाग व वन विभाग यांच्या हद्दीतून येणारा एक रस्ता असून, या परिसरात येण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर वेडीवाकडी वळणे व तीव्र चढण आहे.
या घाटाचे काम 1972 च्या दुष्काळात झाले त्यानंतर 1996 च्या आसपास या रस्त्यावर पहिल्यांदा डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर बऱ्याच वेळा रस्त्याचे नूतनीकरण झाले घाटाचे रुंदीकरण सुद्धा झाले. मात्र घाट रुंदीकरण करताना साईड पट्टीवर वापरलेला मुरूम पावसाळ्यात वाहून गेल्याने आहे. त्यामुळे घाटातील वळणावर चर पडली असून, हा रस्ता धोकादायक झाला आहे.
दरम्यान, याठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी भुलेश्वर भक्तांकडून होत आहे.