भोसरी अडीच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

पिंपरी – खाऊचे आमिष दाखवून एका अडीच वर्षीय मुलीस घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी वीस वर्षीय तरुणास अटक केली आहे. ननकु श्रीविलास सिंह (वय २०, सध्या रा. भोसरी. मूळ रा. फतेहपूर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडित मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी पिडित मुलीच्या घरी आला. ‘चलो दीदी मैं तुम्हें चिकन खिलाता हुँ’, असे म्हणत त्याने अडीच वर्षीय मुलीला सोबत नेले. त्यानंतर त्या मुलीचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब लक्षात येताच पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक रूपाली पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.