भोर -तालुक्यात जुलै महिन्यापासून करोनाने धुमाकूळ घातला असताना आज (दि. 2) मात्र भोरला दिलासा मिळाला आहे. 29 संशयितांपैकी 22 जणांचे अहवाल करोना निगेटिव्ह आले आहेत.
आज एकही करोना बाधित रुग्ण आढळला नसून 29 पैकी 7 जणांचे व आज तपासणी साठी पाठवलेल्या 32 जणांचे असे एकूण 39 जणांचे आहवाल येणे बाकी आहेत.
करोना बाधितांची संख्या आज अखेर 211 असून यातील 139 जणांनी करोनावर मात केली. त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर 66 बाधितांवर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.