भीमापाटस कारखाना कुल यांच्यामुळेच सुरू

कामगार संघटनेने दिला एकमुखी पाठींबा

दौंड- दौंड तालुक्‍याची अर्थवाहिनी असलेला भीमापाटस सहकारी साखर कारखाना आमदार राहुल कुल यांच्यामुळेच पुन्हा जोमाने सुरू करता आला. कुल यांच्या प्रयत्नातूनच कारखाना सुरू राहणार आहे. यामुळे कारखान्यातील सर्व कामगार कुल यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष अर्जुन दिवेकर यांनी सांगितले.

दौंड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून भीमापाटस कारखाना सुरू करण्याकरीता विशेष निधीची तरतूद केली होती. मला मंत्री पद नको पण माझ्या शेतकरी सभासद बांधवांसाठी कारखाना सुरू झाला पाहिजे, अशी भूमिका ठेवून आमदार कुल यांनी घेतली होती. त्यामुळेच कारखाना पुन्हा जोमाने सुरू झाला. साखर विक्री संदर्भात योग्य वेळी निर्णय घेतल्याने कारखाना फायद्यात आणण्याचे कामही आमदार कुल यांनी वेळोवेळी केले आहे. कारखान्याच्या हिताचे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यातच असल्याने कारखान्यांतील कामगार संघटनेकडून कुल यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर पाठींबा देण्यात येत असल्याचेही संघटनेचे अध्यक्ष दिवेकर यांनी सांगितले.

दौंड तालुक्‍यात राहुल कुल हे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असून त्यांना कारखान्याचे शेतकरी सभासद तसेच कामगार, कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. भीमापाटस कारखान्यावरच तालुक्‍याचे अर्थकारण अवलंबून असल्याने कारखाना सक्षम नेतृत्त्वाच्या हाती असणे गरजेचे आहे, याच विचारातून कुल यांना पाठींबा वाढत आहे. यानुसार भीमा साखर कामगार संघ, मधुकरनगर यांच्याकडून कुल यांना पाठींबा जाहीर करण्यात आला असून याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्य पत्रकावर अध्यक्ष अर्जुन दिवेकर यांची स्वाक्षरी आहे तर उपाध्यक्ष शिवाजी खामकर, जनकरल सेक्रेटरी संजय शितोळे, सेक्रेटरी रघुनाथ शेळके, खजिनदार केशव दिवेकर, पदाधिकारी प्रविण शितोळे, नवनाथ ताकवणे यांनीह यास दुजोरा दिला आहे. भिमापाटस सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संघटनेने जाहीर पाठींबा दिल्याने राहुल कुल यांची ताकद वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.