निवडणूक आयोगाकडून सुप्रिया सुळेंच्या हेलिकॉप्टरची तपासणी

मुंबई- सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अनेक राजकीय नेते ठिकठिकाणी प्रचारसभा घेत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या उड्डाण पथकाने महालक्ष्मी रेसकोर्स हेलिपॅडवर सुप्रिया सुळे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. तपासणीनंतर सुप्रिया सुळे त्याच हेलिकॉप्टमध्ये रवाना झाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.