मुंबई – कॉमेडियन भारती सिंगचा पापाराझींसोबत चांगलाच बॉण्ड आहे. पापाराझी त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि भारतीचे त्यांच्यासोबतचे संभाषण खूप मजेदार असते. आता भारतीचा एक नवीन पापाराझी व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारती तिचा मुलगा लक्ष्य याच्याशी पापाराझीची ओळख करून देत आहे.
View this post on Instagram
एका मजेदार संवादात, भारती पापाराझींना सांगते की,’मोठा झाल्यावर तिचा मुलगा तिचा बदला घेईल. या वर्षी एप्रिलमध्ये भारती आणि हर्ष यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. व्हायरल व्हिडिओमध्ये भारती, लक्ष्य आणि हर्ष कारमध्ये दिसत आहेत.’
गोलूचा बदला
शुक्रवारी पापाराझी अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये भारती लक्ष्याची पापाराझीशी ओळख करून देत आहे, ‘ये छोटू है. हा गोलू मी गरोदर असताना आम्हाला घाबरवण्यासाठी स्कूटरवरून आमच्या मागे येत असे. मग भारती पापाराझींना म्हणाली, ‘आता माझा मुलगा बदला घेईल. तो तुमच्या मागे बाईक घेऊन येईल. पापाराझींनीही हर्षशी संवाद साधला आणि त्याला वडील झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. हर्षने पापाराझीची ओळख लक्ष्यशी करून दिली आणि तो त्याचा ‘मामा’ असल्याचे सांगितले.’
लक्ष्यला आपल्या मांडीवर घेऊन कारमधून खाली उतरताना भारतीने पापाराझींचे आभारही मानले. फोटोबद्दल मुलाला सांगताना भारती म्हणाली, ‘ये सारे तेरे मामा है बेटा’ आणि तिने लक्ष्यला त्या सर्वांना ‘मामा’ म्हणायला सांगितले. भारती आणि हर्षचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून ते या कपलच्या पापाराझीसोबतच्या मैत्रीचा आनंदही घेत आहेत. अनेकांनी व्हिडिओला ‘क्यूट’ म्हणत कमेंट केली, तर एका यूजरने लिहिले की, ‘हे दोघे खूप गोड आहेत’.
भारती आणि हर्षने डिसेंबर २०१७ मध्ये गोव्यात लग्न केले होते. 3 एप्रिल 2022 रोजी दोघेही पहिल्यांदा पालक झाले आणि लक्ष्यने त्यांच्या आयुष्यात एंट्री घेतली. सुरुवातीला मुलाला कॅमेर्यांपासून दूर ठेवल्यानंतर, हर्ष आणि भारतीने जुलैमध्ये हॅरी पॉटर थीमवर आधारित फोटोशूटद्वारे लक्ष्यला जगाची ओळख करून दिली. दोघांनी इंस्टाग्रामवर लक्ष्यचे खूप क्यूट फोटो शेअर केले आहेत.